मुंबई, 1 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार ( खेळाडू/ संघटक- कार्यकर्ते) उत्कृष्ट क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार, राज्य क्रिडा साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार सन 2014-15,2015-16, व सन 2016-17 या वर्षाच्या पुरस्कारासाठी 9 डिसेंबरपर्यत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करून अर्जदाराने सादर केलेल्या सर्व attachment upload करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.