पनवेलमध्ये उद्या बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा 

पनवेल, 30 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

नवीन पनवेलमधील पेव्हर ब्लॉक व बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा उद्या सायंकाळी 6.30 वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.          नवीन पनवेल सेक्टर १४ ई-१ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, झोपडपट्टी पुनर्वसन सभापती प्रकाश बिनेदार, बांधकाम सभापती मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे, माजी नगरसेवक के. डी. म्हात्रे, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, रवी नाईक, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे आदी उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.