ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

मुंबई, 28 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

हिवाळा आणि ख्रिसमसनिमित्‍त होणा-या अतिरिक्त गर्दीमुळे मध्य रेल्वेने लोकमान्‍य  टिळक टर्मिनस मुंबई-करमाळी/सावंतवाडी आणि अजनी-करमाळीच्‍या दरम्‍यान 14 साप्‍ताहिक विशेष गाड्या विशेष शुल्‍कासह चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे.

लोकमान्‍य टिळक टर्मिनस-करमाळी वातानुकूलित विशेष गाड्या (4 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01045 साप्‍ताहिक विशेष गाडी 22 आणि 29 डिसेंबर रोजी (2 फेऱ्या) लोकमान्‍य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री 1.10 वाजता निघून त्याच दिवशी सकाळी 11 वाजता करमाळी येथे पोहचेल.
  • गाडी क्रमांक 01046 साप्‍ताहिक विशेष गाडी शुक्रवार दिनांक 22आणि 29 डिसेंबर रोजी (2 फेऱ्या) करमाळी येथून दुपारी 2 वाजता निघून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.20 वाजता लोकमान्‍य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.

 

  • गाडीचे थांबे

या विशेष वातानुकूलित गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्‍नागिरी, कनकवली, कुडाळ, थीवीम स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी सह द्वितीय श्रेणी, 4 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 11 वातानुकूलित तृतीय श्रेणी

 

लोकमान्‍य टिळक टर्मिनस-सावंतवाडी साप्‍ताहिक विशेष गाड्या (4 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01037 साप्‍ताहिक विशेष गाडी 25 डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018  या दिवशी (2 फेऱ्या) लोकमान्‍य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री 1.10 वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी 10.30 वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.
  • गाडी क्रमांक 01038 साप्‍ताहिक विशेष गाडी 25 डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018  या दिवशी (2 फेऱ्या) सावंतवाडी येथून दुपारी 2.5 ला सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 12.20 ला लोकमान्‍य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.

 

  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना  ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्‍नागिरी, कनकवली, कुडाळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आ.

  • डब्याची रचना

1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान आणि 6 सामान्‍य द्वितीय श्रेणी

 

अजनी-करमाळी विशेष गाड्या (6 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01119 साप्‍ताहिक विशेष गाडी 18डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018  या दिवशी (3 फेऱ्या) अजनी येथून सायंकाळी 7.50 ला सुटून दुसऱ्या दिवशी 8.30 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01120 साप्‍ताहिक विशेष गाडी 19डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018  या दिवशी (3 फेऱ्या)  करमाळी येथून रात्री 9.30 ला सुटून दुसऱ्या दिवशी 10 वाजता अजनी येथे पोहचेल.

 

  • गाडीचे थांबे

या गाड्यांना वर्धा, पुलगांव, धामनगांव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावळ, जळगांव, चाळिसगांव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्‍याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्‍नागिरी, कनकवली, कुडाळ आणि थीवीम या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

  • डब्यांची रचना

1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 1 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान श्रेणी आणि 4 सामान्‍य द्वितीय श्रेणी

 

तिकिटांचे आरक्षण

लोकमान्‍य टिळक टर्मिनस आणि अजनी स्‍थानकातून सुटणा-या विशेष गाड्यांचे विशेष शुल्‍का सह आरक्षण सर्व पीआरएस तथा वेबसाईट www.irctc.co.in वर दिनांक  1.12.2017 पासून सुरू होईल. या गाड्यांचे द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित स्‍वरूपात चालविण्‍यात येईल