मुंबई, 25 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत अंधेरी येथील फॉर्च्युन फिटनेसच्या सुयश पाटीलने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले. जेतेपदाच्या लढतीसाठी सात शरीरसौष्ठवपटूंवर मात करीत सुयशने पिळदार शरीरसौष्ठवाच्या जोरावर विजेतेपदाला गवसणी घातली.
आज गणेशगल्लीत नवोदित मुंबई श्री स्पर्धेत तब्बल 220 नवोदित शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. प्रत्येक गटात 40-45 खेळाडू असल्यामुळे यातून आधी 15 खेळाडूंची आणि मग पाच खेळाडूंची निवड करण्यासाठी जजेसना आपले कसब पणाला लावायला लागले. प्रत्येक गटात एकाच ताकदीचे 4-5 खेळाडू असल्यामुळे गटविजेता निवडतानाही त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक गटांमध्ये गटविजेत्यासाठी अव्वल दोन-तीन खेळाडूंमध्ये कंपेरिझनही करण्यात आली. परब फिटनेसच्या किशोर राऊत, नितीन रुपाले या दोन खेळाडूंनी गटविजेतेपद संपादले. परळच्या हर्क्युलस जिमच्याही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांचाच समीर भिलारे उत्कृष्ट पोझरचा मानकरी ठरला.
नवोदित मुंबई श्रीचा निकाल
- 55 किलो वजनी गट :
- किशोर राऊत(परब फिटनेस), 2. अविनाश वणे (पॉवर ऍड), 3. ऋषिकेश परब ( कृष्णा जिम), 4. अजिंक्य पवार (बाल व्यायामशाळा), 5. उपेंद्र पांचाळ (आर.एम.भट).
- 60 किलो वजनी गट :
- साजिद मलिक(हार्डकोर), 2. आकाश घोरपडे (स्लिमवेल), 3. तुषार गुजर (मातोश्री), 4. गिरीष मुढे (बॉडी वर्पशॉप), 5. गोपाळ सोनार (सॅमच्युन).
- 65 किलो वजनी गट :
- विनायक गोळेकर( मातोश्री), 2. चेतन खारवा ( ग्रो मसल), 3. आदेश चिंचकर (आर.एम.भट), 4. कौशल खाडे (एम फिटनेस), 5. प्रज्योत जाधव (मसल ऍण्ड माइंड).
- 70 किलो वजनी गट :
- सुजीत महापत(लीना मोगरे), 2. महेश पवार (पॉवर जिम), 3. आशिष लोखंडे ( आर.एम.भट), 4. निनाद जाधव (बॉडी वर्पशॉप), 5. प्रशांत शिर्के (माँसाहेब).
- 75 किलो वजनी गट :
- समीर भिलारे( हर्क्युलस जिम), 2. अमोल जाधव ( गुरूदत्त जिम), 3. कल्पेश मयेकर ( परब फिटनेस), 4. गणेश सावंत (सालम जिम), 5. संतोष भेंडू (परब फिटनेस).
- 80 किलो वजनी गट :
- सुयश पाटील(फॉरच्युन फिटनेस), 2. सिद्धीराज परब ( रिगल जिम), 3. रोहन कांदळगावकर ( फोकस फिटनेस), 4. शहाजी चौगुले (मेघाली जिम), 5. कपिल नालगुडे (गुरूदत्त).
- 80 किलोवरील वजनी गट :
- नितीन रुपाले (परब फिटनेस), 2. रविकांत पाष्टे (हर्क्युलस फिटनेस), 3. जावेद सय्यद (एम.जी.फिटनेस), 4. निलेश रेमजे (क्रिएटर जिम), 5. अक्षय माँगटी (सालम जिम).
- उत्कृष्ट पोझर :
समीर भिलारे (हर्क्युलस जिम)
- नवोदित मुंबई श्री :
सुयश भिलारे (फॉरच्युन फिटनेस)