- वर्ग 2 व 3 मधील रिक्त पदांसाठी अर्ज मागवले
नवी मुंबई, 9 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
सिडकोमध्ये लवकरच नोकर भरती होणार आहे. वर्ग 2 व 3 मधील रिक्त पदे भरण्यासाठी सिडको महामंडळाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 7 नोव्हेंबरपासून अर्ज ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. संकेतस्थळावरील ‘करिअर’ या टॅब वर क्लिक करून 27 नोव्हेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत.
अर्ज मागवलेली रिक्त पदे
- आज्ञावलीकार (प्रोग्रॅमर) पदासाठी 1
- क्षेत्र अधिकारी (सामान्य) पदासाठी 4
- क्षेत्र अधिकारी (सामाजिक सेवा) पदासाठी 1
- संगणक चालक (कॉम्प्युटर ऑपरेटर) पदासाठी 3
- लिपिक-टंकलेखक पदासाठी 27
- लेखा लिपिक पदासाठी 21
एकूण रिक्त पदांमध्ये काही पदांसाठी विविध प्रवर्गातील आरक्षण तर काही पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी काय करावे
- रिक्त पदांसाठी अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम नोंदणी करून स्वतःचा पासपोर्ट साईझ फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
- पुढच्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया असून त्यानंतर ऑनलाईन प्रक्रीयेच्या माध्यमातून फी भरणे आवश्यक आहे. (या संदर्भातील विस्तृत माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
- भर्ती प्रक्रीयेबद्दलची सर्व अद्ययावत माहिती तसेच परिक्षेसाठीच्या हॉल तिकीटची उपलब्धता व ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक याविषयीची सर्व माहिती वेळोवेळी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरून पुरवली जाईल. इच्छुक उमेदवारांनी सिडको महामंडळाचे संकेतस्थळ वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.
ऑनलाइन परिक्षा घेणार
- रिक्त पदांच्या भर्तीसाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून सदर परिक्षा 200 गुणांची असणार आहे.
- यामध्ये मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान, सामान्य/व्यावसायिक ज्ञान व तार्कीक परिक्षा (Test of Reasoning) घेण्यात येणार आहे. परिक्षा 120 मिनीटांची असेल
- परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45 टक्के गुणांची आवश्यकता आहे.
- ऑनलाईन परिक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच केवळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.
- भरती प्रक्रिया आणि आरक्षणव इतर अटी
- भर्ती प्रक्रीया, रिक्त पदे, आरक्षण व इतर अटी आणि शर्तींविषयी विस्तृत माहिती सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरwww.cidco.maharashtra.gov.in उपलब्ध आहेत.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- सदर प्रक्रीयेविषयी कोणताही शंका असल्यास कार्मिक विभाग – 022-67918249 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.