ठाणे,4 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांना नोव्हेंबर अखेर पाणी जोडणी, मलनि:सारण जोडणी आणि वीज जोडणी देण्यात यावी तसेच एक टॉयलेटसाठी एक अधिकारी नेमून दर महिन्याला नियमित तपासणी करण्यात यावी, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
स्वच्छतेचे काम एजन्सीऐवजी महिला गटांना
- सध्या सार्वजनिक शौचालये आणि सामुदायिक शौचालये साफ सफाई ज्या एजन्सीद्वारे करण्यात येते. त्या एजन्सीचे कामे बंद करून ती स्थानिक महिला गटांमार्फत साफ सफाई करण्याचा सूचनाही जयस्वाल यांनी बैठकीत केल्या.