मुंबई, 4 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.mega block on central railway
दिवा -कल्याण डाउन फास्टमार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या काळात
- सकाळी 9.25 ते दुपारी 2.45 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाउन फास्ट आणि सेमा फास्ट गाड्या आपल्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावर थांबतील.
- डाउन फास्ट गाड्या ठाणे स्टेशननंतर ठाणे ते कल्याणदरम्यान डाउन स्लो मार्गावर चालविण्यात येतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 10.37 ते दुपारी 3.6 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमा फास्ट गाड्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे सेवा
- सकाळी 11 ते सायंकाळी 5 याकाळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व डाउन आणि अप गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
- सीएसएमी ते चुनाभट्टी, वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात तसेच चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 याकाळात मेगाब्लॉक
- सकाळी 1.34 ते 4.47 या काळात वडाळा रोड, सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच साळी 9.56 ते दुपारी 4.43 या काळात सीएसएमटीहून वांद्रे, अंधेरीसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या काळात पनवेल,बेलापू, वाशी तसेच सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.9 या काळात वांद्रे, अंधेरी येथून सीएसएमटीला सुटणाऱ्या अप मार्गावरील गाडया रदद करण्यात आल्या आहेत.
- मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावर प्लॉटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
- मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात प्रवास करण्याची परवानी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.