मुंबई, 26 ऑक्टोबर 2017/AV News Bureau :
मुंबई (मध्य) आरटीओ कार्यालयामार्फत वाहन नोंदणी प्रमाणपत्र हे स्मार्ट कार्ड स्वरुपात देण्यात येणार आहे. 200 रुपयांचे शुल्क भरुन नव्या स्वरुपातील हे वाहन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई (मध्य) च्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
- मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आतापर्यंत कागदी स्वरुपात वाहन नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत होते.
- 29 सप्टेंबर पासून हे नोंदणी प्रमाणपत्र आता स्मार्ट कार्ड स्वरुपात देण्यात येणार आहे. सध्या हे प्रमाणपत्र प्रायोगिक तत्वावर देण्यात येणार आहे.
- स्मार्ट कार्ड स्वरुपातील हे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता वाहन धारकास सीएमव्हीआर 81 प्रमाणे 200 रुपये शुल्क प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे भरायचे आहे.
- ही रक्कम भरल्यानंतर वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड स्वरुपात तात्काळ जारी करण्यात येणार आहे. तरी इच्छूक वाहनधारकांनी 200 रुपयांचे शुल्क भरुन नव्या स्वरुपातील हे वाहन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई (मध्य) च्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.