प्रातिनिधिक फोटो
नवी मुंबई, 26 ऑक्टोबर 2017AV News Bureau:
कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्सप्रेस या गाडीचे इंजिन आज दुपारी 3 च्या सुमारास सावंतवाडी रेल्वेस्थानकाजवळ रुळावरून घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या अपघातामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक काहीसे कोलमडले आहे.
गाडी क्रमांक गाडी क्रमांक 12224 –एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत होती. मात्र सावंतवाडी-झाराप रेल्वे स्थानकांच्या हद्दीत दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन दुपारी 3.3 च्या सुमारास रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी आणि वेर्णा येथून तातडीने मदत धाडण्यात आली आहे. लवकरच मदत कार्य पूर्ण करून रेल्वे मार्ग मोकळा करण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अधिक माहिती प्रवाशांना उपलब्ध व्हावी यासाठी 022-27587939 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. तसेच गाड्यांची अधिक माहिती मिळवण्यासाठी www.konkanrailway.com संकेतस्थळाला भेद द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.