- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्प उभारणीस मान्यता
मुंबई, 24 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:
मुंबई महानगर क्षेत्रात उभारण्यात येत असलेले मेट्रो रेल्वेचे जाळे आता अधिक विस्तारित होत असून ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-5 मार्गास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा मार्ग एकूण 23.50 कि.मी.चा असून त्यामुळे मुंबई महानगराशी भिवंडी आणि कल्याणचा परिसर जोडण्यास मोठी मदत होणार आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण या उन्नत मार्गावर 16 स्थानके
- कल्याण एपीएमसी, कल्याण स्टेशन, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव एमआयडीसी, राजनौली गाव, टेमघर, ओसवाल वाडी, गणेश नगर, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुम आणि कापूरबावडी यांचा समावेश आहे.
- मार्च 2021 पर्यंत म्हणजे 41 महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
- 2021 मध्ये प्रति पाच मिनिटामागे एक गाडी याप्रमाणे वेळापत्रक.
- या प्रकल्पाची पूर्णत्वानंतरची एकूण किंमत 8 हजार 240 कोटी असेल.
- या मार्गामुळे 2021 मध्ये 2.3 लाख तर 2031 पर्यंत दैनंदिन तीन लाखाहून अधिक प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
- या प्रकल्पामुळे प्रवाशांना मेट्रो मार्ग-४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) व मेट्रो मार्ग-११ (तळोजा – कल्याण) या मेट्रो मार्गाशी प्रवाशी जोडले जाणार आहेत.
- या मार्गावर किमान 10 व कमाल 50 इतके भाडे आकारण्यात येणार आहे.
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.