पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लष्करी हेलिकॉप्टर उडवले

  • तुर्कस्तानकडून लष्करी हेलिकॉप्टर घेण्याच्या विचारात

इस्तंबुल, 23 ऑक्टोबर 2017:

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी गेल्या रविवारी तुर्कस्तानचे लष्करी हेलिकॉप्टर T-129 उडवले. यामुळे अब्बासी हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत, ज्यांनी लष्करी हेलिकॉप्टर उडवले आहे. सध्या अब्बासी तुर्कस्तानच्या दौऱ्यावर असून पाकिस्तानी लष्करासाठी या देशाकडून हेलिकॉप्टर घेण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉन न्यूजच्या रिपोर्टनुसार, T-129 हेलिकॉप्टरच्या परिक्षणानंतर पाकिस्तानी आणि तुर्कस्तानच्या पत्रकारांशी बोलताना अब्बासी यांनी सांगितले की, संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात तुर्कस्तानची कामगिरी अव्वल दर्जाची आहे. अब्बासी यांनी तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींचेही अभिनंदन केले. तुर्कस्तानच्या या लष्करी हेलिकॉप्टरचे पाकिस्तानी लष्करी अधिकारी अभ्यास करीत आहेत. संपर्ण अभ्यास झाल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

T-129 हे लष्करी हेलिकॉप्टर वजनान हलके असून मिसाइल आणि मशिन गनने मारा करण्याची क्षमता आहे.