- राज्यात आज लोडशेडिंग केले नसल्याची महावितरणची माहिती
मुंबई, 8 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:
विजेच्या मागणीइतका पुरवठा झाल्यामुळे आज संपूर्ण राज्यात लोडशेडींग करावे लागले नसल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. आज 15 हजार 400 मेगावॅट इतकी विजेची मागणी होती. या मागणीच्या प्रमाणात म्हणजे 15 हार 400 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाल्यामुळे राज्याच्या कोणत्याही भागात लोडशेडींग करण्यात आले नसल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
राज्यात सुरू असलेल्या लोडशेडींगवरून सर्वच थरांतून संताप व्यक्त केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने अ आणि ब वर्गात मोडणाऱ्या शहरांमधील लोडशेडींग शनिवारपासून रद्द केल्याची घोषणा केली. मात्र ग्रामीण भागातील लोडशेडींग अद्याप सुरू आहे. मात्र आज सुट्टीचा दिवस असूनही मागील काही दिवसांच्या तुलनेत विजेची मागणी कमी नोंदली गेली आहे. आज राज्यभरात 15 हजार 400 मेगावॅट इतकी विजेची गरज असून उपलब्धताही तेवढीच आहे. महावितरणने लोडशेडींग टाळण्यासाठी अल्पकालीन कराराद्वारे 1200 मेगावॅट इतकी वीज खरेदी केल्यामुळे राज्याच्या कोणत्याही भागात भारनियमन करावे लागले नसल्याचे जाहीर केले आहे.
महावितरणला उपलब्ध झालेली वीज
- महानिर्मिती कंपनीकडून सुमारे 4500 मेगावॅट
- अदानी – 1800-2000 मेगावॅट
- रतन इंडिया – 500 मेगावॅट
- केंद्रीय प्रकल्प – 3800 मेगावॅट
- जेएसडब्ल्यु- 300 मेगावॅट
- सीजीपीएल – 560 मेगावॅट
- एम्को – 75 मेगावॅट
- पवन उर्जेतून 100 ते 200 मेगावॅट
- उरण गॅस प्रकल्प- 270 मेगावॅट
- कोयनासह जलविद्युत प्रकल्पातून सुमारे 100-200 मेगावॅट