- मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवली
मुंबई, 5 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:
नागरिकांनी डिजिटल पेमेंटच्या पर्यायाचा अधिकाधिक वापर करावा यासाठी रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. उपनगरीय रेल्वे गाड्यांचे सीजन तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वापर करणाऱ्या प्रवाशांना आता 31 मार्च 2018 पर्यंत 0.5 टक्के सवलत देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. discount on digital payment
भारतीय रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डाद्वारे सीजन तिकीट (मासिक, तिमाही, अर्ध वार्षिक आणि वार्षिक) खरेदी करणा-यांना 0.5% पर्यंत ची सवलत दिली आहे. या योजनेचा अधिकाधिक प्रवाशांना लाभ घेता यावा यासाठी या सवलतीची मुदत आता 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी सीजन तिकीट खरेदी करण्यासाठी अधिकाधिक डिजिटल पेमेंटचा पर्याय स्वीकारावा आणि या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.