राज्यातील महामार्गांवर 100 प्रसाधनगृहे उभारणार

  • महिला प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
  • शौचालयाची सुविधा मिळणार मोफत
  •  सार्वजनिक बांधकाम विभाग व पेट्रोलियम कंपन्यांमध्ये करार

मुंबई, 4 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

राज्यातील राज्यमार्ग तसेच प्रमुख राज्य मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्यात पहिल्या टप्प्यात शंभर ठिकाणी प्रसाधनगृहांसह  अन्य सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व पेट्रोलियम कंपन्यांमध्ये आज  सामंजस्य करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागरिकांना ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून महिला प्रवाशांसाठी ही दिलासा मिळणार आहे. 100 toilets on highway

 

  • राज्यातील महामार्गावर अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या/ शौचालयाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशासाठी यामुळे गैरसोय होते. या गोष्टी विचारात घेऊन महिलांच्या राईट टू पी व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य मार्ग व प्रमुख राज्य मार्गावर प्रसाधनगृहे व जनसुविधा केंद्रे उभारण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांबरोबर करार केला आहे. यामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तीन कंपन्यांचा समावेश आहे. 100 toilets on highway

 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन ते पाच एकर जागा या कंपन्यांना भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहे. या ठिकाणी कंपन्या पेट्रोलपंप, सार्वजनिक प्रसाधनगृहे, इंटरनेट व दूरध्वनी सुविधा, उपहारगृह/रेस्टॉरंट, एटीएम केंद्र तसेच वाहनांसाठी वाहनतळ आदी सुविधा निर्माण करणार आहेत. या जागेचे भाडे शासनाला मिळणार आहे. या सर्व जनसुविधा केंद्रांचा आराखडा एकसारखा असणार आहे. येथील प्रसाधनगृहांचा वापर मोफत करता येणार असून ग्रामीण भागातून जाणाऱ्या महामार्गावर नागरिकांना याचा लाभ मिळेल. या सर्व सुविधांची देखभाल या कंपन्या करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.