नवी मुंबई, 30 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
कलंबोली -जेएनपीटी मार्गावर चिंचपाडा येथे उड्डाण पुलाचे काम सुरु असताना, लोखंडी सांगाडा कोसळल्याने सुमारे पाच कामगार जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.या दुर्घटनेतील जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कळंबोली- जेएनपीटी मार्गावरील चिंचपाडा परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपूलासाठी लागणारा लोखंडी सळ्यांचा सांगाडा चढवण्याचे काम सुरू होते. मात्र अचानक हा सांगाडा आणि सोबत असलेले पत्रे खाली कोसळले. या वेळी तेथे काम करीत असलेले सुमारे पाच कामगार जखमी झाल्याची माहिती झोन 2 चे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचेही माने यांनी सांगितले.