मुंबई, 29 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
मोहरम निमित्त मानखुर्द विभागामध्ये 1 ते 2 ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे.
घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना 1 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7 ते 2 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
- घाटकोपर, विक्रोळीकडून येणारी व मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांनी उमरशी बप्पा जंक्शन व्ही. एन. पुरव मार्ग, तर घाटकोपर, विक्रोळीकडे जाणाऱ्या वाहनांनी व्ही. एन. पुरव मार्गाने उमरशी बप्पा जंक्शनकडून जावे.
- याकाळात घाटकोपर-मानखुर्द लिंकरोड, मधुकर कदम मार्ग, पी. एल. लोखंडे मार्ग या मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आले असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी कळविले आहे.