- दोन दिवसांत १०५२ अनधिकृत फेरीवाल्यांकडून सव्वा कोटीचा ऐवज जप्त
मुंबई, 29 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आता रात्री उशिरापर्यंत धडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल.ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दोन दिवस विशेष मोहिम राबवून १०५२ अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करुन ८० चारचाकी हातगाड्या व ५० सिलेंडर्ससह १ कोटी १८ लाख ३१ हजार रुपये इतक्या किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. bmc action against feriwala
मुंबई शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न जटील बनला आहे. याची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त जऱ्हाड यांनी रात्री उशिरापर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश फेरीवाला अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले आहेत. खाद्यपदार्थ रस्त्यांवर बनवून विकणे, रेल्वेस्टेशन परिसरातील फेरीवाला इत्यादी अतिक्रमणांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयात एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तसेच दर गुरुवारी प्रत्येक परिमंडळातील उप आयुक्तांना त्यांच्या अधिपत्याखालील विशेष पथकांना एकत्र करुन एक संयुक्त कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 21 आणि 28 सप्टेंबर रोजी ९२२ अनधिकृत फेरीवाल्यांसह एकूण १०५२ अनधिकृत फेरीवाल्यांवर ही कारवाई करण्यात आली. bmc action against feriwala