आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सुधारित नियम उद्यापासून लागू
मुंबई, 27 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
क्रिकेट सामना खेळताना गैरवर्तन करणा-या क्रिकेटपटूंना संघातून बाहेर काढले जाण्याची तरतूद क्रिकेट परिषदेच्या नियमांमध्ये करण्यात आली आहे. हे सुधारित नियम २८ सप्टेंबर पासून लागू होणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरूध्द बांग्लादेश आणि पाकिस्तान विरूध्द श्रीलंका यांच्यातील अगामी कसोटी मालिकांपासून हे सर्व नियम लागू होणार आहेत.
बॅटच्या आकारमानावर निर्बंध आणि निर्णयाला आव्हान देण्याच्या व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. चेंडू आणि बॅट यांच्यातील ताळमेळ रहावा यासाठी बॅटच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आता संघ सहा बदली खेळाडूंची नावे देऊ शकणार आहे याआधी चारच खेळाडूंची नावे देता येत होती. फलंदाजाने चेंडूला हात लावला असता त्याला बाद देण्याचा नियम आता रद्द करण्यात आला आहे.