- महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश
ठाणे,26 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने जे अनधिकृत लेडीज बार आणि लॉजेस तोडण्याची कारवाई करूनही ते लेडीज बार आणि लॉजेस पुन्हा सुरू झाले असतील तर ते बार आणि लॉज पुढील तीन दिवसांत जमीनदोस्त करा, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. thane commissioner on illegal bars and lodge’s
- ठाणे महानगरपालिकेच्यावतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरांतील अनधिकृत लेडीज बार आणि लॉजेसवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून ती सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यानंतरही शहरामध्ये काही ठिकाणी त्या बारची किंवा लॉजेसची दुरूस्ती करून त्यामध्ये पुन्हा लेडीज बार आणि लॉजेस सुरू करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी आज सकाळी अधिका-यांची बैठक घेवून कारवाईबाबत नियोजन करण्याचे आदेश दिल्याचे आदेश ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
- दरम्यान, जुन्या लेडीज बार किंवा लॉजशिवाय नवीन काही बार तयार झाले असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व संबंधित अधिका-यांना दिले आहेत.