- जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
नवी मुंबई, 23 सप्टेंबर 2017/AV News Bureau: morabe pipeline burst
नवी मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणा-या मोरबे धरणाची जलवाहिनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली. सायन-पनवेल महामार्गाजवळ कामोठे येथे जलवाहिनी फुटून तब्बल 30 फूट उंच पाण्याचे फवारे उडू लागले. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असण्याची शक्यता आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून दुपारी चार वाजेपर्यंत ही दुरूस्तीचे काम सुरू राहण्याची शक्यता आहे. morabe pipeline burst
जलवाहिनीला एका डंपरचा धक्का लागल्यामुळे ही जलवाहिनी फुटली असण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिकेच्या अधिका-यांनी दिली.