नवी मुंबई, 18 सप्टेंबर 2017/AV News Bureau :
कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन 9 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनी सकाळी 10 ते दुपारी 1 या काळात जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज / निवेदने स्विकारणार आहेत.
निवेदन स्विकारण्यासाठी निकष
- लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर (25 सप्टेंबरपर्यंत) या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गा-हाणे ऐकण्यात येईल.
- विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भातील केलेले अर्ज आणि तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.
- सदर दिवशी विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर प्रथम चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्जावर टोकन नंबर नुसार आढावा घेण्यात येणार असल्याचे कोकण विभागीय आयुक्तालयाने कळविले आहे.