ठाणे,17 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
ठाणे महापालिका आस्थापनावरील एकूण १९५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. एकाच वेळी १९५कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची ही पहिलीच घटना असल्यानाने पालिकाकर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- महापालिकेच्या आस्थापनेवर विविध विभागात चतुर्थश्रेणी व तृतीयश्रेणी संवर्गात कर्मचारी कार्यकारत आहेत. चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी लिपिक पदासाठी असलेली शैक्षणिक पात्रता धारण केली असून १३१ शिपाई संवर्गातील लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आहे.
- ‘अ’ वर्ग लिपिक संवर्गातील ७ कर्मचाऱ्यांना उपखाते पदावर पदोन्नती देण्यात आलीआहे.
- ४६ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना ‘अ’ वर्ग लिपिक या पदावर पदोन्नती दिली गेली आहे.
- फायरमनसंवर्गातील ५ कर्मचाऱ्यांना वाहनचालक (अग्निशामक )
- निवडश्रेणी शिपाई/ शिपाई या संवर्गातील ६ कर्मचाऱ्यांना जमादार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे .