मुंबई, 17 सप्टेंबर 2017/AV News Bureau: mega block on central railway
रेल्वेरुळ तसेच विद्युत दुरूस्तीच्या आणि देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेतर्फे आज (17 सप्टेंबर) मेन तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. mega block on central railway
मेन लाइन- कल्याण-ठाणे अप स्लो मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 मेगाब्लॉक
- सकाळी 10.47 ते दुपारी 4.14 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप स्लो आणि फास्ट मार्गावरील गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप फास्ट मार्गावरून चालविल्या जातील. तसेच मुलुंड स्टेशनपासून पुन्हा स्लो मार्गावर चालविल्या जातील.
- सर्व स्लो मार्गावरील गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याणमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- सकाळी 10.8 ते दुपारी 2.42 या दरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट मार्गावरील गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप,मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 10.28 ते दुपारी 3.8 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अफ फास्ट मार्गावरील गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांत थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
- दुपारी 12 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या स्लो मार्गावरील सर्व गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- सीएसएमटी –चुनाभट्टी, वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात तसेच चुनाभट्टी ते वांद्रे, सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या काळात मेगाब्लॉक राहणार आहे.
- सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर,पनवेलला जाणाऱ्या सर्व गाड्या तसेच 9.52 ते दुपारी 4.43 या काळात सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरीला जाणाऱ्या सर्व गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे.
- सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर गाड्या तसेच 10.44 ते सायंकाळी 5.9 या काळात अंधेरी, वांद्रेहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे.
- मेगाब्लॉकच्या काळात पनवेल ते कुर्लादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात पश्चिम रेल्वे तसेच मेन लाइनवरून हार्बरच्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.