मुंबई , 17 सप्टेंबर 2017:
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार ‘सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत.
पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा काँग्रेस कार्यकारणी, ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची प्रदेश काँग्रेस पक्ष कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विकास सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र उर्फ भाई सावंत यांचे चिरंजीव आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी बदलल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना धक्का देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याचे कारण राणे यांनी आधीच दिले होते. त्यातच आता राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने काँग्रेसमध्ये नाराजीचे कारण आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेस कमिटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. यार्श्वभूमीवर राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे.