मंकी हिल येथे मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द

मुंबई,15 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

मंकी हिल येथे ट्रॅक च्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे 6 गाड्या रद्द करण्यात आल्या  आहेत तर 2 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

लोणावळा जवळील मंकी हिल येथे आज ट्रॅक दुरूस्तीच्या कामामुळे सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे- सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस, पुणे- सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस, पुणे-कर्जत पॅसेंजर, कर्जत पुणे पॅसेंजर या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

  • पुणे-भुसावळ आणि भुसावळ –पुणे या एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.