मुंबई, 12 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देताना करावयाच्या कारवाईसाठी व्हीडीओ चित्रीकरण करण्याचे आदेश कायम आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी दिली आहे.
व्हीडीओ चित्रीकरणाशिवाय (सीसीटिव्ही शिवाय) वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देण्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र त्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.
जनहीत याचिका क्र. 28/2013 श्रीकांत माधव कर्वे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणांमध्ये १८ फेब्रुवारी २०१६ रोजी व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसारच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र तपासणीचे काम करण्यात येत आहे. याबाबत स्पष्ट सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने संबंधित कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देताना करावयाच्या कारवाईसाठी व्हीडीओ चित्रीकरणकरण्याचे आदेश कायम आहेत, असे गेडाम यांनी सांगितले आहे.