पणनमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
मुंबई, 12 सप्टेंबर 2017/AV News Bureau: udid dal price
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
- राज्यात या वर्षी उडीद व मुगाचे चांगले उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. उडीद व मूग खरेदी केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, शेतकऱ्यांनी कमी दारात उडीद आणि मूग बाजारात विक्री करण्याची घाई करू नये.खरेदी केंद्रे सुरु होईपर्यंत वाट पहावी. शासन त्यांना हमीभाव मिळवून देईल, असे देशमुख यांनी सांगितले.
- ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे, अशा शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात शेतमाल विक्री न करता शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत शासन शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
- शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन नये म्हणून राज्यभर लवकरच खरेदी केंद्रे उभारली जातील. या केंद्रांवर हमी भावाने शेतकऱ्यांचे उडीद व मूग खरेदी केले जातील. एखादा व्यापारी कमी दरात शेतकऱ्यांचा माल खरेदी करत असेल, तर ती बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शासन अशा व्यापाऱ्यांवर ठोस कारवाई करेल,असेही देशमुख यांनी सांगितले.