-
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराने सन्मान
-
सिंधुदुर्गातील आंदुर्ले ग्रामपंचायत दुसऱ्या तर भोगवे ग्रामपंचायत तिसऱ्या क्रमांकावर
नवी मुंबई, 2 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
कोकण विभागातील सर्वात स्वच्छ ग्रामपंचायतीचा 2016-17 चा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील धाटाव ग्रामपंचायतीला मिळाला आहे. प्रथम क्रमांकासह 10 लाखांचा धनादेशही धाटाव ग्रामपंचायतीला मिळाला आहे. याशिवाय सिधुदुर्गातील दोन ग्रामपंचायतीनीदेखील स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी करीत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या तीन पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत
- ग्रामपंचायतधाटाव ता.रोहा जि.रायगड
विभाग स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रथम क्रमाकांचा 10 लाखाचा पुरस्कार
- ग्रामपंचायत आंदुर्ले ता.कुडाळ जि.सिंधुदूर्ग
विभाग स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान दुसऱ्या क्रमाकांचा 8 लाखांचा पुरस्कार
- ग्रामपंचायत भोगवे ता.वेंगुर्ला जि.सिंधुदूर्ग
विभाग स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तिसऱ्या क्रमाकांचा 6 लाखांचा पुरस्कार
इतर पुरस्कार मिळविणाऱ्या ग्रामपंचायत
- स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार (कुटूंब कल्याण) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार 30 हजार रुपये ग्रामपंचायत पास्थळ ता.जि.पालघर यांना प्राप्त झाला आहे.
- स्व.वसंतराव नाईक पुरस्कार (पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार 30 हजार रुपये ग्रामपंचायत देवघर ता.खेड जि.रत्नागिरी प्राप्त झाला आहे.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार 30 हजार रुपये ग्रामपंचायत म्हाळुंगे ता.भिवंडी जि.ठाणे यांना प्राप्त झाला आहे.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, उपायुक्त (विकास) गणेश चौधरी, सहायक आयुक्त माणिक दिवे, डॉ.तरुलता दानके यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी आदी उपस्थित होते.