मुरुडमधील 24 ग्रामपंचायतमधील आयटीआयधारक तरुणांना संधी
बोर्ली-मांडला, 4 सप्टेंबर 2017/अमूलकुमार जैन: electrician and wireman job
ग्रामीण भागातील नागरिकांच्या विद्युतविषयक तक्रारी ग्रामपंचायत स्तरावर सोडविण्यासाठी एक गाव एक विद्युत व्यस्थापक योजना राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याअंतर्गत मुरुड तालुक्यातील २४ ग्रामपंचायत हद्दीत हा उपक्रम राबविण्यात येणार असून तालुक्यातील आयटीआयधारक बेरोजगार तरुणांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. electrician and wireman job
ग्रामीण भागात वीज खंडीत झाली की, पुर्ववत होण्यास बराच कालावधी लागतो. त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांचा रोजगार तसेच छोटेखानी व्यवसायांवरही होत असतो. ग्रामीण भागातील नागरिकांच्या विद्युत समस्या तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत एक विद्युतसेवक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक उमेदवाराची निवड विद्युतसेवक म्हणून करण्यात येणार आहे. विद्युत सेवक म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील आयटीआय झालेला किंवा गावात विद्युतसंबंधी कामे करणाऱ्या व्यक्तीस विद्युतसेवक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. विद्युतसेवकची निवड ही ग्रामसभेत ठराव घेऊन याबाबतची माहिती महावितरण कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे आहे. ग्रामविद्युतसेवक यास प्रतिग्राहक 9 रुपयेप्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा तीन हजार रुपये यापैकी जे काही अधिक असेल ते महावितरण विभागाकडून देण्यात येणार आहे.
- विद्युत सेवकास करावी लागणारी कामे
महावितरण विभागामध्ये विद्युतसेवक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास विद्युत मीटर रिडींग घेणे,विजदेयक पत्रक वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, विद्युतप्रवाह पूर्वरत करणे, विद्युत डीपीमध्ये फ्युज टाकणे, फ्यूज कॉलच्या तक्रारी सोडविणे,पथदिवे यांची देखभाल करणे,नवीन विद्युत जोडणीची कामे करणे, थकबाकीदार यांचा विद्युत पुरवठा खंडीत करणे आदी कामे करावी लागणार आहेत.
- महावितरणचे नियंत्रण
महावितरणने नियुक्त केलेल्या विद्युतसेवक(फ्रॅंचाईझीं ) यावर महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांचे तंत्रिकनियंत्रण व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण राहणार आहे.
ज्या ग्रामपंचायत हद्दीत विद्युतग्राहकांची संख्या ही तीन हजारपेक्षा कमी आहे, त्या ग्रामपंचायत हद्दीत विद्युत सेवक नियुक्त करण्यात येणार आहे.
– सचिन येरेकर,उपअभियंता.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीबुशन कंपनी लि.,मुरुड-रायगड. electrician and wireman job