राज्यात कुष्ठरोग शोध अभियान राबविणार

नवी मुंबईत 6 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या काळात

मुंबई, 4 सप्टेंबर 2017/AV News Bureau: Leprosy treatment 

राज्यातील 22 जिल्हयांमध्ये “कुष्ठरोग शोध अभियान-2017” राबविण्यात येणार असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत 6 ते 15 सप्टेंबर  आणि 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेचे उद्दिष्ट Leprosy treatment 

  • कुष्ठरोग रूग्णांना लवकरात लवकर विना विकृती शोधून त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे
  • नविन सांसर्गिक कुष्ठरोग रूग्ण शोधून औषधोपचाराच्या सहाय्याने संसर्गाची साखळी खंडीत करुन रोगाचा प्रसार कमी करणे
  • कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे.

नवी मुंबईतील मोहिमेचे कार्यक्षेत्र Leprosy treatment 

  • नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दुर्गम व झोपडपट्टी कार्यक्षेत्र, बांधकाम कार्यक्षेत्र, कुष्ठरोगाचे रूग्ण व विकृती असलेले रूग्ण, रहिवाशी असलेले कार्यक्षेत्र अशा ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
  • सदर मोहिम कालावधीत एकुण 138 टिम्स व 45786 घरामधील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
  • कुष्ठरोगाचे निदान व औषधोपचार सर्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात मोफत उपलब्ध आहे.