नवी मुंबई, 30 ऑगस्ट 2017/AV News Bureau: (vegetables in apmc)
मंगळवारी झालेल्या तुफान पावसाचा फटका आता कृषीमालालाही बसला आहे. पावसामुळे वाशीच्या एपीएमसीमध्ये भाजीपाला घेवून येणारी वाहने रस्त्यातच अडकून पडली आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तुंची आवक काहीशी घटली आहे. त्यातच खरेदीदारांनीही पाठ फिरवल्यामुळे भाजीपाल्याचे दर 50 टक्क्यांनी घटल्याची माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली.(vegetables in apmc)
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काल कोसळलेल्या मुसळधार पावसाने गेल्या अनेक वर्षांतील पावसाचा विक्रम मोडला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांमधून येणारा कृषी माल रस्त्यातच अडकून पडला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालाचीही आवक कमी प्रमाणात झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज 457 भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे. दररोज जवळपास 530 ते 600 गाड्यांची आवक नोंदवली जाते. पुरेशी आवक झाली असली तरीही ग्राहकांच्या अभावी भाजीपाल्यांच्या किमतीतही जवळपास 50 टकके घट झाल्याची माहिती भाजीपाला व्यापारी संघाचे अध्यक्ष कैलाश ताजणे यांनी दिली.(vegetables in apmc)
कांदा- बटाटा मार्केटमध्ये जवळपास 120 गाड्यांची आवक झाली आहे. त्यामध्ये 7 गाडी बटाटा आणि 50 गाडी कांद्याची आवक आहे. कांदा आणि बटाट्यांचे दर स्थिर असल्याची माहिती कांदा-बटटा आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिली.