पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत मोठ्या पर्जन्यवृष्टीचा इशारा
मुंबई, 29 मुंबई,2017/AV News Bureau: (heavy rain in mumbai and suburban)
सोमवार रात्रीपासून मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि आजुबाजूच्या पावसाने जोरदार झोडपून काढले. आजही पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या एक तासांत 70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच सकाळी 8.30 वाजल्यापासून 100 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत मोठ्या पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. (heavy rain in mumbai and suburban)
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही विपरित परिणाम झाला आहे. शीव आणि माटुंगा दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल उशीराने धावत आहेत. माहीम येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. पनवेल ते वाशी आणि पनवेल ते ठाणे या मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी लोकल उशीराने धावत आहेत. दरम्यान मानखुर्द ते सीएसटी या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. (heavy rain in mumbai and suburban)
असून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाणी साचण्याच्या ठिकाणी 136 पंप कार्यरत आहेत व पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. महापालिकेची 6 मोठे पंम्पिंग स्टेशन्सही पूर्ण क्षमतेसह सुरु आहेत.
सद्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हिंदमाता, शीव मार्ग क्रमांक 24 आणि अंधेरी सबवे या ठिकाणची बेस्ट वाहतूक वळविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रस्त्यांवरील वाहतूक संथगतीने सुरु आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
- नवी मुंबईतही जोरदार पाऊस (heavy rain in mumbai and suburban)
नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या चार तासात नवी मुंबई शहरात 28.95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन ठिकाणी झाडं कोसळली आहेत. सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास सीबीडी सेक्टर 8 बी इथं डोंगराचा काही भाग खचला आहे. तसंच नेरूळ सेक्टर 19 इथे एका मंदिराची भिंत कोसळली आहे. सानपाडा, घणसोली, वाशी इथल्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.