मुंबई, 27 ऑगस्ट 2017/AV News Bureau:(mega block in central railway)
रेल्वे मार्गाची देखभाल तसेच दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मेन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शिवाय दादर-रत्नागिरी या गाडीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.mega block in central railway
कल्याण-ठाणे अप फास्ट लाइन वर सकाळी11.15 ते सायंकाळी 4.15 पर्यंत (mega block in central railway)
- सकाळी 11 ते सायंकाळी 4.21 या काळात कल्याणपर्यंत चालविण्यात येणाऱ्या अप फास्ट लाइनच्या सर्व गाड्या कल्याण-ठाणे दरम्यान अप स्लो लाइनवर चालविण्यात येतील. तसेच या मार्गावर गाड्या सर्व स्थानकावर थांबविण्यात येतील.त्यानंतर ठाणे ते सीएसएमटीदरम्यान पुन्हा अप फास्ट मार्गावर गाड्या वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकांवर थांबतील आणि सीएसएमटी स्थानकात 20 मिनिटे उशिराने पोहोचतील.
- सकाळी 10.8 ते दपारी 2.42 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्वन डाउन फास्ट गाड्या आपल्या नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
पॅसेंजर गाडीच्या मार्गात बदल (mega block in central railway)
- गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी-दादर गाडी दिवा स्थानकापर्यंत चालविली जाईल. तर गाडी क्रमांक 50103 दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकातून सोडण्यात येईल. मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या 20-30 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बरमार्गावर मेगाब्लॉक (mega block in central railway)
- सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 या काळात पनवेल,बेलापुर, वाशी येथून सीएसएमटीला जाणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 या काळात सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहत.
- मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटी-कुर्ला तसेच वाशी-पनवेल मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4 या काळात ट्रान्सहार्बर तसेच मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.