ठाणे,27 ऑगस्ट 2017/AV News Bureau:(50 cycle stations in thane)
इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यास मदत ठरणा-या देशातील पहिल्या महत्वाकांक्षी स्स्वयंचलित सायकल स्टेशन प्रकल्प ठाण्यात सुरू करण्यात आला आहे.
- 50 ठिकाणी स्टेशन्स (50 cycle stations in thane)
या प्रकल्पातंर्गत शहरात विविध ठिकाणी 50 ठिकाणी सायकल स्टेशन्स उभी करण्यात येणार असून प्रत्येक स्टेशनवर 10 सायकली ठेवण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहेच पण वर्षभरामध्ये किमान 50 कोटी रूपयांची बचत होण्यास मदत होणार आहे.
- 250 रुपयांत सभासदत्त्व (50 cycle stations in thane)
या प्रकल्पातंर्गत ठेवण्यात आलेल्या सायकलींचा उपयोग करण्यासाठी नागरिकांना सभासद होण्याची आवश्यकता आहे. आधार कार्ड किंवा पासपोर्टची झेरॉक्स तसेच 250 रूपये भरून त्याला सभासद होता येईल. सभासद म्हणून नोंदणी झाल्यानंतर सायकलस्वाराला स्मार्ट कार्ट देण्यात येईल. सदर स्मार्ट कार्डचा वापर करून सायकलस्वार सायकल लॉक किंवा अनलॉक करू शकतो.
- यातील सर्व सायकलींसाठी जीपीएएस प्रणालीचा वापर करण्यात आला असून त्यामुळे नियंत्रण कक्षामध्ये सायकल ट्रॅक करता येवू शकणार आहे. अशा पद्धतीचा हा प्रकल्प भारतात पहिल्यांदाच होत असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.