मोरबे धरण 99 टक्के भरले

नवी मुंबई, 26 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण शुक्रवारी संध्याकाळी जवळपास  99 टक्के भरले. शुक्रवारी संध्याकाळीच धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तब्बल 4 वर्षांनी धरणामधील  पाण्याची पातळी पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचली आहे. याआधी 2013 साली धरण पूर्ण भरले होते.

माथेरान परिसरातील पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवरील मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून त्याची क्षमता 450 दशलक्ष लिटर्स आहे. शुक्रवारी संध्याकाळी धरणातील जलसाठय़ाने 87.75 मीटर पातळी गाठून ते वाहू लागले. धरण पूर्ण भरण्यासाठी अजून पूर्णांक 25 पाणीपातळीची आवश्यकता आहे.

यावर्षी पावसाने जोर धरल्यामुळे मोरबे धरण क्षेत्रामध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यातच धरण जवळपास भरले आहे. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या धरणातून नवी मुंबई परिसराला दिवसाला 360 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.