मुंबई, 22 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल केली.
- संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे.
- या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
- 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
- 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
- गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी 25 सप्टेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :
पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114.