गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुविधा
मुंबई, 22 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मार्गावर टोलमाफी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराजवळच्या पोलीस स्थानकात जावून पाससाठी माहिती द्यावी, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.याशिवाय गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा,असेही त्यांनी म्हटले आहे.
टोलमाफीच्या पाससाठी काय करावे
- कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी जाहीर केली आहे. टोलमाफीसाठी नागरिकांनी आपले नाव, वाहनाचे नाव, कोठे जाणार त्या गावाचे नाव आदी तपशील जवळच्या पोलीस स्थानकावर द्यावा, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
- सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई गोवा महामार्गाचे काम केले असून त्या कामांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली आहे. या मार्गावर पोलीस, संबंधित जिल्हा प्रशासन व परिवहन विभागाने एकत्रितपणे मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीच्या काळात मदतीसाठी क्रेन, तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा.
- गणेशोत्सव काळात मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात जात असतात. त्यांच्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा देण्यात आल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगडमध्ये जाणाऱ्यांनी द्रुतगतीमार्गे खोपोली, पाली मार्गाचा वापर करावा. रत्नागिरीत जाणाऱ्यांनी कराड-चिपळून मार्गाचा तर सिंधुदुर्गला जाणाऱ्यांनी कोल्हापूर, गगनबावडा मार्गे तसेच सावंतवाडीला जाणाऱ्यांनी निपाणी, अंबोली घाट मार्गाचा वापर करावा.
गणेशोत्सवसंबंधी आणखी बातम्या :
गणेशभक्तांसाठी आणखी 8 गाड्या
https://goo.gl/oHBkD4
सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज
https://goo.gl/YSxoS8
गणपती स्पेशल गाडीचे डबे कमी केले
https://goo.gl/8drFdp
दादर-सावंतवाडी विशेष दिवा स्थानकात थांबणार
https://goo.gl/nM81Xz
‘नवी मुंबई महापौर श्रीगणेश दर्शन स्पर्धा -2017’
https://goo.gl/D4AV7X
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
https://goo.gl/953aJ6
गणेशोत्सवासाठी एसटीच्या 2216 जादा बसेस
https://goo.gl/26R7Vp
पश्चिम रेल्वेतर्फेही गणेशोत्सवासाठी गाड्या
https://goo.gl/wEJ4os
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 60 गाड्या
https://goo.gl/VXN2Zq