महावितरणचे पनवेलकरांना आवाहन
पनवेल, 21 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
महावितरणच्या सेवेबाबत काही तक्रारी असल्यास 22 ऑगस्टपर्यंत पनवेलकरांनी आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. येत्या 23 ऑगस्टला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे पनवेलमध्ये येणार असून त्यावेळी नागरिकांची निवेदने त्यांना देण्यात येणार आहेत.
नवीन पनवेल मधील खांदा कॉलनीच्या सेक्टर ६ मध्ये असलेल्या श्रीकृपा हॉल येथे बुधवार,२३ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत बावनकुळे पनवेलकरांची विजेसंबंधित गाऱ्हाणी ऐकणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.
इथे नोंदवा तक्रारी
नागरिकांच्या महावितरण बाबतीत असलेल्या तक्रारी, सूचना किंवा निवेदनाची प्रत पनवेल येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात 2२ ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील. तसेच cebhandup@gmail.com , sevashi@gmail.com, eepanvelu@gmail.com या मेलवर किंवा @cebhandup, @sevashi या ट्विटर अकाउंटवर आणि ०२२-२७४५३७८७ व ९८३३८९१४०५ या क्रमांकावरही तक्रारी दाखल कराव्यात. २३ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमातही नागरिकांच्या तक्रारी तसेच निवेदने उर्जामंत्र्यांना देण्यात येतील, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.