उद्या लोकल, एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

गर्डरच्या कामामुळे ठाकुर्ली स्थानकात विशेष ब्लॉक

मुंबई, 19 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकाजवळ  रविवारी (20 ऑगस्ट) सहा रेल्वेमार्गांवर पादचारी पूलासाठी  गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे सकाळी 9.15 ते दुपारी 12.45 पर्यंत तीन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या  विशेष ब्लॉकच्या  काळात मध्य रेल्वेवरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

डोंबिवली-कल्याणदरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गावर आणि अप-डाउन फास्ट मार्गावर तसेच 5,6 रेल्वे लाइनवर सकाळी 9.15  ते दुपारी 12.45 दरम्यान विशेष ब्लॉक राहणार आहे.

 

मेन लाइनवरील गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • सकाळी 9.10 ते दुपारी 12.50 या काळात कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे.
  • सीएसएमटीवरून सकाळी 8.36 ते सकाळी 11.34 या काळात कसारा, आसनगाव, टिटवाळ्यासाठी सुटणाऱ्या सर्व गाड्य रद्द करण्यात आल्या आहेत.
  • सीएसएमटीवरून सकाळी 8.29 ते दुपारी 11.50 या काळात अंबरनाथ, बदलापुर, कर्जतसाठी सुटणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • कसारा, आसनगाव, टिटवाळा येथून सकाळी 8.30 ते दुपारी 12.21 या काळात सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • अंबरनाथ, बदलापुर, कर्जत येथून सकाळी 8.53 ते दुपारी 12.22 या काळात सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

20 ऑगस्ट रोजी रद्द केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या

  • 12124/12123 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
  • 12110/12109 मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस
  • 12118/12117मनमाड-मुंबई-मनमाड गोदावरील एक्सप्रेस

 

शॉर्ट टर्मिनेट केलेल्या एक्सप्रेस गाड्या

  • 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सीएसएमटी पोहोचणारी 12140 नागपुर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक रोड पर्यंत चालविण्यात येणार आहे.
  • 20 ऑगस्ट रोजी सीएसएमटी येथून दुपारी 3 वाजता सुटणारी 12139 मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक रोड येथून 6.35 ला पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

 

नाशिक,पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक 12321 हावडा-सीएसएमटी मुंबई मेल वाया छियोकी 2 वाजता मुंबईत पोहोचेल. ही गाडी दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 13201 राजेंद्र नगर-एलटीटी एक्सप्रेस दुपारी 2 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 12168 वाराणसी- एलटीटी एक्सप्रेस दुपारी 2.15 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 12072 जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी 2.50 ला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दुपारी 2.50 ला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक11094 वाराणसी सीएसएमटी मुंबई महानगरी एक्सप्रेस दुपारी 3.15 ला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 12294 इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस 3 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 11014 कोइम्बतुर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दुपारी 2.40 वाजता पोहोचेल.

 

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या कर्जत,पनवेल, दिवामार्गे चालवल्या जातील. त्यामुळे 10 ते 40 मिनिटे उशिराने धावतील.(कल्याणला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या दिवा स्थानकात थांबणार आहेत.

  • गाडी क्रमांक 17221 काकीनाडा पोर्ट-एलटीटी एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11024 कोल्हापुर- सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 17032 हैदराबाद- सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11042 चेन्नई-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस

 

  • गाडी क्रमांक 11029 सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस दिवा,पनवेल, कर्जतमार्गे चालवली जाईल. (कल्याण स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

 

कसारा,नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

  • गाडी क्रमांक 17222 एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसहून दुपारी 1 वाजता सुटेल.
  • गाडी क्रमांक 11055 एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस दुपारी 12 वाजता सुटेल.
  • गाडी क्रमांक 12542 एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस दुपारी 12.15 ला सुटेल.
  • गाडी क्रमांक 12869 सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस सकाळी 11.50 ला सुटेल.
  • गाडी क्रमांक 11061एलटीटी-दरभंगा एक्सप्रेस दुपारी 12.25 ला सुटेल.