घराचा मालकी हक्क देण्यासाठी समिती स्थापन करणार
मुंबई,11 जुलै 2017/AV News Bureau:
मुंबई व मुंबई उपनगर क्षेत्रात अनेक वर्षापासून राहत असलेल्या भाडेकरूना घराचा मालकी हक्क देण्यासंबंधी शासनामार्फत महिन्याभरात समिती गठीत करण्यात येईल. या संबंधी कायदा करण्यासाठी शासन योग्य निर्णय घेईल, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिली.
आमदार मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. भाडेकरूना घर मालकी हक्क देण्याबाबत महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम १९९९ मध्ये तरतूद नसल्याने भाडेकरू देत असलेल्या भाड्याच्या 100 पट रक्कम शासन दरबारी जमा करण्यासंबंधी मुंबईतील स्थानिक लोकप्रतिनिधींशी बैठक घेण्यात येईल. तसेच न्यायालयात हे प्रकरण जलदगतीने चालविण्यासाठी वकीलांची नेमणूक करण्यात येईल. असेही वायकर यांनी सांगितले.