देशभरात गोवर लसीकरण मोहीम सुरू
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
लहान मुलांमध्ये आढऴणा-या गोवर या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार देशभरात लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. भारतासह जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया प्रांतातील दहा अन्य सदस्य देशांनी 2020 सालापर्यंत गोवर या रोगाचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे.
यानुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 9 महिने 0 ते 15 वर्षे या वयोगटातील बालकांसाठी देशभरात टप्प्याटप्प्यात गोवर लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सुमारे 41 कोटी बालकांना या मोहिमेत समाविष्ट करून घेण्याचे उद्दिष्ट असून जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम ठरेल.
पहिल्या टप्प्यात पाच राज्यातील 3 कोटी 30 लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात आली असून ऑगस्ट 2017 मध्ये अन्य आठ राज्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.