मुंबई, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांकडून टोल न आकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आगामी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट देणे व सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनेबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्दे
- कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना दि.22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी आणि दि. 1, 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी पथकरातून सूट देण्यात येणार आहे.
- परिवहन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना पासेस आणि स्टिकर द्यावेत.
- सायन-पनवेल, खोपोली-पाली-वाकण रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत.
- गर्दीच्या वेळी जड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, क्रेन आणि रुग्णवहिका सेवा तयार ठेवाव्यात, अशा सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.