बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी हा निधी वापरणार-निलंगेकर
मुंबई, 2ऑगस्ट 2017/AV News Bureau :
बांधकाम कंपन्याकडून बिल्डींग कंन्सस्ट्रक्शन सेसद्वारे आत्तापर्यंत पाच हजार कोटी सेस जमा झाला आहे. या रकमेचा वापर बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यासाठी करण्यात येईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
सेसमधील निधी खर्च करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. बांधकाम कामगारांना डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभ दिला जातो. आतापर्यंत 180 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कामगारांच्या खात्यात जमा झाली आहे. या कामगारांना महात्मा जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेता येतो. त्याचप्रमाणे केंद्राच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या बांधकाम मजुराला घर बांधण्यासाठी 1 लाख रुपये सेसच्या निधीतून दिला जातो,असेही निलंगेकर यांनी सांगितले.
राज्यात सुमारे 25 लाख मजूर आहेत. बांधकाम व्यवसायात परराज्यातील मजुरांची संख्या अधिक असल्याने कामगारांची नोंदणी हा महत्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील ज्या मजुरांची नोंदणी मनरेगामध्ये झाली आहे, त्यांची परस्पर नोंदणी केली जाते. बांधकाम मजुरांस कामावर असताना मृत्यू आल्यास चोवीस तासांच्या आत मदत देण्यात येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.