वस्तू व सेवा कर परिषदेकडे पाठविण्यात येणार
मुंबई,1ऑगस्ट 2017/AV News Bureau:
महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या हातमाग पैठणी साडीवर लावण्यात येणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो वस्तू व सेवा कर परिषदेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वित्त राज्य मंत्री दिपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.
महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या हातमाग पैठणी साडीवर लावण्यात येणारा वस्तू व सेवा कर कमी करण्यासंदर्भात नियम 93 अन्वये सदस्य जयंतराव जाधव यांनी मुद्या उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना केसरकर यांनी ही माहिती दिली. पैठणीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाते लक्षात घेता, पैठणीस ही करमाफी मिळावी याकरीता न शिफारस करण्यात येणार आहे. असे केसरकर यांनी सांगितले.