लघुउद्योग आणि लघु गृहकर्जासाठी फायदा
बचत खातेधारकांना ठेवींवर अर्धा टक्यांनी कमी व्याज
मुंबई, 31 जुलै 2017/AV News Bureau:
भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील ठेवींवर अर्धा टक्यांनी व्याजदरात कपात केली आहे. यामुळे बचत खात्यामध्ये असणा-या पैशांवर आता ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहे.
1 कोटी आणि त्यापेक्षा कमी पैसे असणा-या बचतखात्यांवर एसबीआय ४ टक्के व्याज देत होती. ते आता ३.५ टक्के करण्यात आले आहे. एक कोटीपेक्षा अधिक रकमेच्या ठेवींच्या बचतीसाठी व्याजदर 4 टक्के दराने कायम ठेवण्यात आला आहे. हा व्याजदर आजच लागू केला आहे. बचत खात्यावरील व्याजदात कपात केल्यास याचा फायदा लघुउद्योग, कृषी आणि लघुगृहकर्ज घेणा-यांना होणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.