आधुनिक व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी

नवी मुंबई, 30 जुलै 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे शहरातील क्षेत्रातील गरजू महिला व मुली तसेच युवक – युवती यांचेकरीता विविध 7 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण 2017-18 या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे.

  • विविध व्यवसाय प्रशिक्षण

(1)शिवणकाम, (2) फॅशन डिझायनिंग, (3) एम.एस.सी.आय.टी., (4) मेहंदी व ब्युटिशियन, (5) ॲडव्हान्स ब्युटिशियन, (6) वेब डिझायनिंग तसेच (7) ई – टॅक्सेशन या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा समावेश आहे.

  • आवश्यक कागदपत्रे

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता – उत्पन्न रू. 2.40 लक्ष असल्याबाबतचा तहसिलदार ठाणे यांचेकडील उत्पन्न दाखला, निवडणूक ओळखपत्र / पाणीपट्टी / विज बिल / आधार कार्ड / 3 वर्षाचा भाडे करारनामा / पारपत्र (Pass Port) / विवाह नेांदणी दाखला / रेशनकार्ड / मतदार यादीताल नाव / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असा वास्तव्याचा पुरावा, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, वयाबाबत जन्माचा दाखला / पॅनकार्ड / बेानाफाईड सर्टिफिकेट व शाळा सेाडल्याचा दाखला / शैक्षणिक पुरावा अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

  • अधिक माहितीसाठी संपर्क

सीबीडी बेलापूर येथील बेलापूर भवन येथे समाज विकास विभागाशी (022- 27563505)संपर्क साधावा.

प्रकाश कांबळे – घणसेाली, ऐरोली व दिघा विभाग (संपर्कध्वनी 9969008088),

शरद गंभीरे – वाशी, तुर्भे व कोपर खैरणे विभाग (संपर्कध्वनी – 9702309054),

दादासाहेब भेासले – बेलापूर, नेरूळ विभाग (संपर्कध्वनी – 9702974123) यांचेशी संपर्क साधण्याचे महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.