मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, 29 जुलै 2017/ Av News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेतर्फे मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (30 जुलै) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आल्याचे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

  • दिवाकल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी 30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक
  • सकाळी 38 ते दुपारी 2.54 या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) येथून सुटणा-या डाऊन जलद तथा सेमी जलद लोकल निर्धारित स्थानकांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप तसेच मुलुंड स्थानकांवर थांबविण्यात येईल. तिथून पुढे या लोकल अप जलद मार्गावर चाविण्यात येतील.
  • ठाणे ते सीएसटीएम दरम्यानच्या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकांदरम्यान थांबतील. या काळात लोकल २० मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 08 ते दुपारी 2.42 या काळात सीएसटीएमवरून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसटीएम हून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या डाउन स्लो गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • सकाळी 21 ते दुपारी 3.45 या काळात सीएसटीएम हून वाशी, बेलापूर, पनवेल कडे जाणा-या लोकल सकाळी 10.38 ते दुपारी 3.49 या काळात पनवेल, बेलापूरहून
  • सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद राहतील.सकाळी 52 ते दुपारी 3.26  या काळात पनवेल, बेलापूर, वाशी हून सीएसटीएम साठी सुटणा-या लोकल बंद राहणार आहेत.
  • सकाळी 44 ते संध्याकाळी 4.13 या वेळात बांद्रा, अंधेरीहून सुटणा-या अप हार्बर मार्गावरील लोकल बंद राहणार आहेत.
  • या मेगाब्लॉक दरम्यान पनवेल आणि कुर्ला येथील फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल चालिवण्यात येणार आहेत.
  • या काळात सकाळी 00 ते संध्याकाळी 6.00 या काळात हार्बर मार्गावरील प्रवाश्यांना मेन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.