दारूची वाहतूक करणाऱ्या पोलिसाला पकडले

  • प्रातिनिधिक फोटो

 

बोर्ली-मांडला, 25 जुलै 2017:

गावठी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पोलीस हवालदारालाच पोलिसांनी गजाआड केले. मंगेश यशवंत सावंत असे या पोलीस हवालदाराचे नाव असून ते अलिबाग मुख्यालयात कार्यरत आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी दारूसह चार चाकी गाडीही जप्त केली आहे.याप्रकरणी सावंत यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारा मंगेश सावंत हे आपल्या ताब्यातील गाडीतून गावठी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी किशोर साले यांना मिळाली. त्यानुसार मुरुड येथील परेश नाका येथे मंगळवारी पहाटे सापळा रचून पोलिसांनी सावंत याची गाडी अडवली. गाडीची तपासणी केली असता गावठी दारू सापडली. याप्रकरणी पोलिसांनी मंगेश सावंत याला ताब्यात घेतले. सावंत याच्या ताब्यातील गाडीत 24 हजार 500 रुपयांची गावठी दारू सापडली असून पोलिसांनी दारूसह गाडीही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.