बेलापूरमध्ये अनधिकृत इमारत जमीनदोस्त

नवी मुंबई, 25 जुलै 2017/AV News Bureau:

बेलापूर विभागातील शहाबाज येथील बांधकाम सुरू असलेल्या 2 मजल्याचे बांधकाम झालेल्या, निवासी वापर नसलेल्या अनधिकृत इमारतीवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून बांधकाम तोडले.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जोशी व महेश कुंभार बांधत असलेल्या या इमारतीचे बांधकाम थांबविण्यासाठी बेलापूर विभाग कार्यालयामार्फत एम.आर.टी.पी. कायद्यातील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण पथकाचे उपायुक्त अमरीश पटनिगेरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त प्रियंका काळसेकर व शाखा अभियंता प्रशांत पिंपळे यांनी कारवाई करत अनधिकृत ठरवलेल्या इमारतीवर कारवाई करून बांधकाम तोडण्यात आले.