नवी दिल्ली, 20 जुलै 2017/AV News Bureau:
रामनाथ कोविंद यांची भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. कोविंद यांनी उमेदवार मीरा कुमार यांचा त्यांनी पराभव केला आहे. कोविंद यांना 2930 मते (मतांचे मूल्य 7 लाख2 44) तर मीरा कुमार यांना 1 हजार 844 मते (मतांचे मूल्य 3 लाख 67,340) मिळाली आहेत. रामनाथ कोविंद 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत.
राष्ट्रपतीपद हे जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि इमानदारीने सांभाळण्याचे आश्वासन रामनाथ कोविंद यांनी दिले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कोविंद यांनी सर्व आमदार, खासदार आणि सर्व देशवासियांचे आभार मानले .
प्रतिस्पर्धी उमेदवार मीरा कुमार यांनी रामनाथ कोविंद यांचे निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीटरवरून कोविंद यांचे अभिनंदन केले आहे.
Congratulations to Shri Ram Nath Kovind Ji on being elected the President of India! Best wishes for a fruitful & inspiring tenure.
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2017